Monday, March 29, 2010

मैत्रीण माझी हट्टी गं उन्हाळ्याची सुट्टी गं


सांगली मधून engineering संपून मी पुण्याला नौकरी ला लागलो , मी "हुशार" ( सर्व toper लोकांची माफी मागून हा "हुशार " शब्द मी वापरत आहे ) असल्या मुले मला 3rd year मधेच 2 आणि final year मध्ये 1 आश्या 3 कंपनी कढून ऑफर होती . मी पुण्यातालीच कंपनी chose केली , खूप साऱ्या कारणान पैकी एक कारण म्हणजे माझा ट्रेककिंग करण्याचा छंद इथे जोपासण्यासाठी full scope होता आणि तो दर वीकेंड ला साजरा पण करता येत होता .शुक्रवारी रात्री आम्ही ट्रेक ला जायचो , आणि रात्रीचा ट्रेक म्हंटले कि मुली सर्वात पुढे , women empowerment ह्यालाच तर खऱ्या अर्थाने म्हणता येईल
रात्री ट्रेक करण्याची थ्रिल काही वेगळीच असते , सगळे झोपल्या नंतर आम्ही शिवाजीचे मावळे आणि त्या मावलीनी गड जिंकण्यासाठी निघायचो , तो संथ असा वारा , मोकळे आकाश , त्या आभाळातल्या सुंदर दिसणाऱ्या चांदण्या आणि त्यांच्या सर्वान मध्ये तो एकटाच कोरलेला चंद्र हे सौंदर्य लवकर झोपनार्यांच्या नशिबी कशे येणार हो ????? असो त्यांचे नशीब त्यांच्या सोबत
रात्री ट्रेक करत असताना झालेले विनोद , सगळयान त्रास होताना सुद्धा काही विनोदामुळे सगळ्या group चे मनोबल वाढणे ... बर पुढचीच टेकडी तिथ आपण थांबू अशी खोटी आश्वासने देऊन पोरीना धीर देणे हा सगळा नित्य नियमाचा कार्यक्रम चालू असतो . घामाघूम होऊवून वर पोहोंचल्यावर ती झुणका भाकर ,कांदा आणि लोणचं भुकेल्या पोटाला जो स्वाद देउन जाते त्याची तुलना ताज हॉटेल मधल्या जेवणाला सुद्धा नाही .ह्याचा अर्थ मी ताज मध्ये जेवलो आहे असा होत नाही. ;) मीठ तिखट आंबट भाजी आळणी झाली , आश्या काही complains नसतात , कित्ती भारी पेक्षा पोट भर खाण्याचे महत्व असते .
माझे ट्रेककिंग चा प्रेम दिवसेन दिवस वाढत चालेले होते. पण आमच्या क्लासच्या group ला ट्रेककिंग ची सवय नव्हती आणि क्लास मधला आमचा group नुकताच IT कंपनी मध्ये लागला होता त्या मुळे शनिवार आणि रविवार सर्वांकडेच मोकळा असायचा .
"आम्ही पण ट्रेक करू " हा त्यांचा हट्ट होता पण ह्या सगळ्यांनी ट्रेककिंग कधीच केले नव्हते कॉलेज ते घर scooty वर येणाऱ्या ह्या पोरींना आणि पोरांना ट्रेक झेपेल का नाही हा प्रश्न माझ्या समोर होता , सगळा विचार करून आम्ही सिंहगडावर स्वारी करण्याचे ठरवले . ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी ५.३० चा सुमारास एक मित्राच्या रूम वर भेटलो तिथे गाड्या ठेवल्या आणि टवेरा मध्ये बसून सिंहगडच्या पायथ्याशी पोहोंचलो ... खरे तर ह्याचे मला फार दुख होत होते कि आपण सिंहगड नचढता गाडी मध्ये बसून आलो पण ह्या group ला ते झेपले नसते हे त्यांनी पायऱ्या चढतानाच दर्शविले.
आम्ही सिंहगड ट्रेक केला हे त्यांच्या मनातील गैरसमज मला दूर करण्याची काहीच इच्छा नव्हती त्या मुळे मी गप्पच होतो , कारण सिंहगड च्या top ला गाडी नेवून काही पायऱ्या चढणे म्हणजे ट्रेक नव्हे ;) त्यात माझी एक मैत्रिण "अतिम्सा" बेंगाली होती . कॉलेज मध्ये कशी , कधी आणि कुठून आली त्यासाठी वेगळा एक article लिहावे लागेल ती आमच्या group मध्ये सगळ्यात जास्त भाव खाणारी पोरगी , नाकाच्या शेंड्यावर राग , म्हणजे साध्या भाषेत अगदी हट्टी आणि पूर्ण पणे बालीश ,कोणाचीच तिच्या समोर बोलायची हिम्मत होत नसे .
थोडक्यात म्हणजे पूर्णपणे "atitude - धारी " Jasa hanuman "gadha - धारी " tashi ti "attitude - धारी " , जसे श्रीराम भक्त हनुमानानी आपल्या गदानि असुरांचा नाश केला तसेच हि आपल्या attitude नि सर्व मुलांचा नाश करयाची , ह्या कारणांमुळे मला कायम तिच्या मध्ये स्वयं हनुमान दिसायचे :) (ह्या नंतर मी जिवंत राहिलो तर पुढचा पोस्ट लिहीन )
आश्या ह्या "attitude - धारी " मुली समोर ट्रेक ला जाण्यापूर्वी मी एक चूक केली आणि तिला challenge केले कि "ट्रेक तेरे बस कि बात नहीं" ... आणि ती माझ्या जीवनातल्या असंख चुकान पैके एक मोठी चूक. तिने ते पूर्ण मनावर घेतले आणि अख्खा ट्रेक मला हे prove करत होती कि ट्रेक ती पण करू शकते.
बाकी सगळे मित्र आपण सिंहगडावर आलो ह्याचे पुरावे तयार करत होते , सर्वाना त्यांच्या कंपनी मधे show करन्यासाठी फोटो काढायला सुरु केले मग एखदा orkut pic , मग एखादा "friends forever" वाला pic ज्या मध्ये सगळे असतील मग group मधले favourite 2 , काही copuls , काही to be couples , काही undecided काही असेच नो couples .काही ब्रोकन couples , वगेरे वगेरे .
सगळ्यांनी खूप सारे फोटो काढल्या नंतर सिंहगड खरया अर्थाने explore करायचे असे आम्ही ठरवले म्हणजे अतिम्सा नि ठरवले , बाकी कोणाची मजल तिला नाहीं म्हणायची सिंहगडवर तर काय रोजच लोक येतात आपण आज सगळा सिंहगड चालून काढण्याचा प्रस्ताव तिने मांडला आणि तसेच ठरले आणि खरो खरच अतिम्सा सगळ्या group ला नाचवत होती आम्ही जेवढे फिरलो , तेवढ़े ते कधिच फिरले नसतील .
तुमच्या पैकी किती जणांना माहिती आहे माहिती नहीं सिंहगडला २ टोक आहेत आम्हाला एका टोकाला पोहंचायालाच दुपार झाली सगळे वैतागले होते मी सहज म्हंटले "आपण त्या दुसऱ्या टोकाला जाउ शकू का ?" सर्वांनी माझ्या कडे हा मुलगा वेडा झालाय आश्या नजरेने बघितले कारण सगळ्यांचा stamina संपला होता पहिल्याच ट्रेक मध्ये ते एवढे चालले कि सगळे म्हणत होते आता "नो मोरे ट्रेक" कदाचित मनातून मला चांगल्याचा शिव्या देत असतील आणि म्हणत असतील , काय गरज होती ह्या मुला सोबत येण्याची? , मस्त शनिवार झोपले असते , एखादा पुस्तक वाचले असते etc etc .... शिवाजी महाराज जेवढे सिंहगड जिंकण्याचा confidence बाळगत होते त्याच्या दुप्पट confidence बाकी सर्वान मध्ये built up झाला होता कश्यासाठी तर "ह्या पुढे आम्ही ट्रेक करणार नाही" या साठी.
त्या नंतर आम्ही सिंहगडावर जेवण केले मस्त झुणका भाकर , भज्जी आणि ती आंब्याची चटणी ह्या वर ते famous दही साखर वाह मज्जा आली होती अगदी ह्या stage पर्यंत आलो होतो कि baas आत्ता झोपायाचेच .
मुलींच्या डोक्यामध्ये कधी काय येईल हे देव सुद्धा सांगू शकत नाही , अतिम्सा ला सिंहगडाच्या दुसऱ्या टोकाला आत्ताच जायचे होते आणि त्या साठी एकही जन ह्या गोष्टीला ला तयार होणार नव्हता कारण खरो खर जेवण खूप झाले होते , तिने माझ्या कडे बघू नये म्हणून मी आडवा झालो होतो , मृत्यू कधी कोणाला विचारून येत नहीं तसे तिने मला येऊन विचारलं "चल आपण जाउया का ?" नाहीं म्हणालो असतो तर खूप काही ऐकावे लागले असते , वरून सगळ्यां समोर विचारल्या मुळे हो म्हणणे साहजिकच होते तिची एवढी बडबड ऐकून डोक्याला ताप करून घेण्या पेक्ष्या भर उन्हात पाय उचलणे अगदी सोपे होते ... ह्य आमच्या "attitude -धारी " कधीही कोणाचेच ऐकायची नाहीं ... मग एकदा ठरले म्हणजे ठरले mag no cheating.... पण मी आधीच तिच्या ओवर estimated प्लान ला , आपण जाउ असे आश्वासन देऊनि बसलो होतो .
थोड्या वेळातच आम्ही त्या दुसऱ्या अवघड आणि कधीच पोहन्चू शकणार नाहीं आश्या गडाकढे निघालो , बाकी लोकांना पण आमच्या साहसाचे कवतुक वाटत असावे atleat "काय daring आहे?" एवढे तरी ते अवघड नक्कीच होते . आंम्ही ते करणार का नाहीं ह्या दृष्टीकोनातून सगळे आमच्या मागे यायला लागले .... खूप चढ उतार होते आम्ही दोघे एकमेकांना आधार देऊन ते कडी कापारे खड्डे दगड गवत काश्यालाही धरून खाली आणि परत वर चढत होतो , खूप वेळ चालल्या नंतर आम्ही जेव्हा मागे वळून बघितले तेव्हा आम्हाला विश्वासच बसला नाहीं कि आजून खूप पार करायचे आहे आणि १/३ च रस्ता पार केलाय , आमच्या मागे येनारे सगळ्यांनी कधीच हाथ टेकले होते आणि आम्हाला call करून सांगितले कि आम्ही सगळे गाडीत जावून बसतोय तुम्ही तिथेच उतारा परत सिंहगड ला नका येवू आम्ही तिथेच येतो त्या पर्वताच्या पायथ्याशी .
वाट काही संपत नव्हती आणि तिचे सगळे विषय हि तेवढेच लांब , तेवढ्यात आम्हाला एक मेंढपाळ भेटला त्याने आम्हाला विचारले कोण तुम्ही ? कुठे चाललात ?
त्याला जेव्हा कळले आम्ही त्या डोंगरा कडे निघालोय त्याने खूप गोष्टी सांगितल्या आत्मा , भूत प्रेत , देवींच कोप , एका जोडप्याचा खून etc etc आणि सगळ्यात illogical statement म्हणजे "तिथे तर माझ्या बकरी सुद्धा चरायला जात नाहीं " WTF ??? बकरी चरायला जात नाहीं म्हणून ती जागा चांगली नाहीं .... ha ha ha LOL
आता फार हसू येतंय पण खरोखर त्याने अर्धा जीव खाल्ला होता आणि उरलेला अर्धा अतिम्सा ने डोंगरावरुन खाली वर् करून खाल्ला होता . however आम्ही दोघांनीही त्याला एक devil smile देऊन आम्ही तिकडे जाणारच आहोत असा सिग्नल दिला , तरीही मनात आत्ता खूप भीती निर्माण झाली होती ... कारण त्या पुढे खरोखर दोघेच तिथे होतो अगदी त्या direction नि वाट सुरु होण्या पासून ते संपे पर्यंत , आम्ही चालत होतो आणि तो कायम वाहणारा वारा सुद्धा थांबला होता. तिचा tape चालुच होता.
खूप सारे छोटे छोटे पहाड ओलांडून , घामाघूम होऊन आत्ता आम्ही त्या जागेवर पोहोंचलो होतो ...
त्या जागेवर एक खूप मोठा दगड होता किमान माझ्या hight पेक्षा ३ पट मोठा , एक छोटेशे देऊळ जिथे खूप दिवस दिवा लावला नव्हता , तो वारा पण आत्ता परत आला होता , सूर्याने आपले सगळे विराट रूप आवरायला सुरवात केली होती , अतिशय सुंदर असा तो नजारा होता आम्ही दोघांनीही दगडाला पाठ टेकून त्या कड्या वरून पाय खाली ठेऊन त्या मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्याचे ठरवले , मी तिला सांगितले एक मस्त असा deep श्वास घे , येणाऱ्या थंड वाऱ्याची झुळूक तुझ्या चेहऱ्यावर घे , ते झाडांच्या पानांचे गीत ऐक आणि २ मिनटे शांत बस मग बघ कसे फ्रेश वाटते आम्ही तिथेच बसून होतो.
असे वाटले हे सगळे आमचा विजय सोहळा साजरा करायला जमले आहेत आणि हे सगळे असतानाही ती शांतता मंत्र मुग्ध करणारीच होती .
आम्ही पहिलेच वीर ज्यांनी हा गड जिंकला अशी स्वताची समजुत करून घेतली होती.
आत्ता मात्र इथे येण्यासाठी लागणारे सारे अडथळे आम्हाला काडी मात्र वाटत होते. ....ती कधीही न संपणारी वाट आत्ता तिथे बसून खूप भारी वाटत होती, तो मेंढपाळ , आमचे मित्र ज्यांनी प्रयत्न करूनही त्यांना इथे येता आले नाहीं , ह्या सर्व कारणान मुळे आम्ही फार खुश होतो.
तिथे आल्यावर ऑन top ऑफ the world वाटले , .
तिने कबूल ही केले एवढे भारी तिला कधीच वाटले नाहीं , मला ह्याचा आनंद होता कि माझ्या ह्या ट्रेककिंग च्या छदा मुळे मी तिच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा दिवस तिला देऊ शकलो ... नाहींतर कायम आमचा मुलगा नुसता फिरत असतोय पहाडी एवढेच ऐकले होते घराच्यां कढुन :)
तिने ट्रेक करत असताना खूप काही गोष्टी ऐकवल्या ... मी फक्त ऐकत होतो ... कारण हे नव्हते कि मला काही बोलायचे नव्हते कारण हे होते कि तिच्या कडे एवढे काही बोलण्यासारखे असयाचे कि माझे विषय ex .(१. नवीन ड्रेस घेतला , २. ऑफिस मध्ये नवीन मुलगी आली etc ) म्हणजे फारच शुल्लक वाटायचे ...म्हणून गप्प बसने का और सिर्फ सुननेका :)
आता ह्या "attitude -धारी" बालीकेने sun सेटचा मोमेंट नक्कीच enjoy केला होता पण मनात हा आनंद जास्त होता कि हा पहाड आमच्या group मधल्या एकानीही पार केला नाहीं तो फक्त तिने पार केला ह्याचा आनंद तिला गगनात मावेनासा झाला होता. हिमालय मध्ये जी खूप मोठी शिखरे असतात त्यांना त्यांचा hight नुसार नावे असतात म्हणून तिने ह्या पहाडाला "4142 point " असे नाव दिले , ह्याचा अर्थ त्या पहाड़ाची hight 4142 mts
होती असे नव्हे ही आमची eng कॉलेज मधली रोल numbers आत्ता त्या जागेचे नाव झाले होते .आंपण परत इथेच भेटायचे असे ठरऊन आम्ही खाली चालयला सुरवात केली.
मित्रांनी आमचा चांगलाच पान उतारा घेतला उशीर झाला होता सगळे जन ओरडत होते पण आमच्या दोघांच्याही काना मधून एकही शब्द आत जात नव्हते , कारण त्या अवघड ट्रेक ची विजय आजूनही आमच्या डोक्यात दरवळत होती.
मी जेव्हा हे घरी सांगितले तेव्हा आईने " फक्त तुम्ही दोघेच तिथे होतात ?" असा प्रश्न ज्या दीर्घ श्वासात विचारला त्या नंतर लक्ष्यात आले कि आईला हे सगळे नाहीं सागितले असते तरी चालले असते म्हणजे "आम्ही सिंहगड ला जावून आलो " एवढे सुद्धा चालले असते.

- कुशल

24 comments:

  1. pahilach attempt ka lihinyacha?

    ReplyDelete
  2. Superb...........
    You should be a write, Mama.......

    ReplyDelete
  3. hmm Good Start, nice humor.
    मी "हुशार" ( सर्व toper लोकांची माफी मागून हा "हुशार " शब्द मी वापरत आहे ) : Topers r not always "हुशार" so mafi vaigare kai...
    As I said, "atitude - धारी " : The Best...
    " फक्त तुम्ही दोघेच तिथे होतात ?": he pan ultimate...
    baki sahi... kahi shivya astil tar offline ghalte :P
    keep writing, waiting for the next blog :)

    ReplyDelete
  4. sahi re kushlya mast lihila aahes .... aasach lihit ja bhari bhari ... :)

    ReplyDelete
  5. ekk bumber bhawa... jiklas fullach...
    " फक्त तुम्ही दोघेच तिथे होतात ?"
    Attitude dhari...
    sahi words use kelas... jik tu...
    pan yat tu thoda jastach romantic watatos... lihinyachya style ne.. :P

    ReplyDelete
  6. ayeee salla ... tumhi lokani mala samjalay kay haan ??? ;)

    Romanticism phakt tumachya kadech asava ka ?nways
    she my friend man ...so no romance only danga :)

    ReplyDelete
  7. @madhuri :- Thanks for appreciating and motivating for writing blogs :)

    @shirkya :- Dhanyawad bhava , fullach blogging suru kelay ...baghu atta.

    ReplyDelete
  8. aggaagaaa ...majhe blog lihine sarthak jhale ... dunyet kadhi navhe te majhya blog la comments kelet :)

    Dhanyawad.

    ReplyDelete
  9. कामा कड़े लक्ष द्या ज़रा. तवाल्क्या पूरे. बाकी ब्लॉग मस्त आहे ... खरा वाटत नाही तुज्या कड़े बघून .. पण ठीक आहे .. ;-)

    ReplyDelete
  10. HA ha ha a ha ha ha ha ha h lol.... Gud one !

    Topper ani hushar... avadali shabdarachana...
    bahutek bakiche pan lok astil na re pan trekking la? :-P

    ReplyDelete
  11. Attitude dhari BONGALI mulagi kon hoti khara walchand la?????
    Ummmmmmmmmmmmmmmm
    mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
    mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm

    ReplyDelete
  12. 4142 point.....
    ladaki mili to dost ko bhul gaya haannn... 43 number pan yeto 42 nantar mhantala... :-P
    Buss ka hich ka dosti ... yaad rakhana.. ladaki,train aur bus....

    ReplyDelete
  13. hoy re tula kasa visaren ....pan tu tithe asatas tar tujha number pan add kela asta ...

    you should have left ab tak 56 and came with us ;)

    ReplyDelete
  14. Hey Kushal bhari lihalai.... अतिम्सा ki jai ho...well done both... :)

    Prajakta

    ReplyDelete
  15. @Hari - jase disata tase nasta mhanun tu fasata ;)

    @Prajakta - Dhanyawad , aamchi pan thodi jai keli asti tar kahi bighadale naste :)

    ReplyDelete
  16. khuuuup chan lihal bhaya....mjhya sobt rahun art yety ha ha ha ha ha.... :-) :-D

    ReplyDelete
  17. @Swapnil - 43 nantar yeto re aadhi yeto **

    ReplyDelete
  18. aani kushal - as a writer khup bhari lihil aahes re........ no comments abt "HER".....kay Sarkar??

    ReplyDelete
  19. @Su - > Tase kahi nahin haan ...exactly balance kelay donhihi numbers na mi ... majha vichar kelay ka kadhi ... donhi side la mich receiving end la hoto :)

    ReplyDelete